कोल्हापूर : राज्यात सर्वाधिक नफा मिळवल्याने कुतूहलाचा विषय बनलेल्या इचलकरंजी येथील चौंडेश्‍वरी सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी विरोधी देवांग समाजाच्या चौंडेश्‍वरी पॅनेलने १६ जागा जिंकत सत्ता मिळवली. सत्ताधारी पॅनेलला बिनविरोध निवडुन आलेल्या केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले. सुतगिरणीत सत्तांतर घडल्याचे स्षप्ट झाल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतषबाजी करून जल्लोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौंडेश्‍वरी सुतगिरणीच्या १७ जागांसाठी निवडणुक जाहीर झाली होती. सत्तारुढ पॅनेलचे गंगाधर तोडकर हे बिनविरोध निवडुन आले होते. उर्वरीत १६ जागांसाठी २ अपक्षांसह ३४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीसाठी ८५.६३ टक्के मतदान झाले होते.

आज मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच चौंडेश्‍वरी पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. मतमोजणीअंती १२९ मते बाद ठरवण्यात आली. सत्तारुढ गटाने बाद मतांची फेरमोजणीची मागणी केली. तरीही सत्तारुढ पॅनेलचा धुव्वा उडवत चौंडेश्‍वरी पॅनेलने सुतगिरणीत सत्तांतर घडवून आणले.

विजयी उमेदवार याप्रमाणे – राजेंद्र बिंद्रे,डॉ. गोविंद ढवळे  गजानन होगाडे, कुमार कबाडे, संजय कांबळे, शिरीष कांबळे, गजानन खारगे, विजय मुसळे, मनोहर मुसळ, विलास पाडळे, अरुण साखरे, महेश सातपुते, डॉ. विलास खिलारे, सुवर्णा सातपुते, ज्योती वरुटे, श्रीकांत हजारे.