कोल्हापूर: गेल्या आठवड्यात देव माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करणाऱ्या एका टोळीस पकडल्यानंतर लगेचच कोल्हापूर पोलिसांनी आणखी एका टोळीचा छडा सोमवारी लावला. पोलिसांनी कोल्हापुरात दुचाकीवरून उलटी विक्रीच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन किलो १५ ग्रॅम वजनाची दोन कोटी एक लाख रुपये किमतीचे देव माशाची उलटी (अंबर ग्रीस) व इतर असा दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोल्हापूर येथे उलटी विक्रीसाठी येणाऱ्या लोकांची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी वेगवेगळी पथके तैनात केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व सहकार्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक ते पारीक पूल रस्त्यावर सापळा लावला. तेथे दुचाकीवरून आलेले करण संजय टिपगडे, संतोष अभिमन्यू धुरी व जाफर सादिक महंमद बाणेदार यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून वरून वरील प्रमाणे मुद्देमाल मिळाला आहे. त्यांना मुद्देमालासह शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. ३ दिवसापूर्वी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जवळील सरनोबतवाडी येथे सुमारे तीन कोटी रुपयांची उलटी विक्री करणाऱ्या एका पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Story img Loader