Samarjeet Singh Ghatge to Join NCP-SP: लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षप्रणीत महायुतीकडून कुणाला कुठे उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता वाढू लागली आहे. तिन्ही पक्षांमधील इच्छुकांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील? याचं गणित नेतेमंडळी चर्चांमधून बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. पक्षाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात एका कार्यक्रमात बोलताना समरजितसिंह घाटगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच, जयंत पाटलांवर मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व समरजितसिंह घाटगे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कागलमध्ये एकत्र आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला. “आज सकाळी समरजितसिंह घाटगे यांनी मला मेसेज पाठवला आणि म्हणाले तुम्ही या आणि माझ्या कार्यकर्त्यांशी तुम्ही एकदा बोलले तर बरं होईल. ते म्हणाले उद्या, परवा कधीही या. पण आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो. उद्या परवा नाही तर आजच येतो”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

समरजितसिंह घाटगेंची भूमिका…

दरम्यान, यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. “जयंत पाटील समरजित घाटगेला मागायलाच इथे आले आहेत. मी त्यांना म्हटलं की समोरच्या लोकांनी परवानगी दिली, तरच मी येऊ शकेन. गेल्या निवडणुकीत आपला निसटता पराभव झाला. पण त्यानंतर आम्ही पाच वर्षं काम केलं आहे. मी २०१९ ला निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा कोल्हापूरच्या माध्यमांमध्ये असं मानलं जात होतं की मला ३५ हजार मतं पडतील. मी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मला ९० हजार मतं पडली”, असं समरजितसिंह घाटगे म्हणाले.

Samarjeet Singh Ghatge : “आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो”, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा

“मला माहिती होतं की मी २०१९ ची निवडणूक जिंकणार नाही. पण मी एकाच कारणामुळे ती निवडणूक लढली. २०१९ लढलो, तरच २०२४ ची निवडणूक मी जिंकणार. मलाही एकदा बघायचं होतं. जोखीम होती. चुकून २५ हजार मतं मिळाली असती, तर आज मीही इथे नसतो आणि तुम्हीही इथे नसता”, असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हणताच व्यासपीठासह उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

“माझी एकच अट होती…”

दरम्यान, यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी जयंत पाटील यांच्याशी भेटीगाठी झाल्याचं नमूद केलं. “जयंत पाटील व माझ्या काही भेटी झाल्या. पण आता कुठे आणि कशा हे विचारू नका. त्यांनी मला सांगितलं की निर्णय घ्यायचा की नाही हे ठरवा. आणि तो घ्यायचा असेल तर लवकर घ्या. कारण तुम्हाला तळागाळात काम करावं लागेल. जसं ८ वर्षं मी प्रामाणिकपणे काम केलं, तसंच शरद पवार व तुमच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करेन. या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात सगळ्यात जास्त फटका बसलाय कागल-गडहिंग्लज विधानसभेच्या विकासाला. मी एकच अट घातली की जर माझ्या लोकांनी परवानगी दिली, तर या मतदारसंघात मला तुमची साथ हवी आहे. या मतदारसंघाच्या भविष्याला एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे”, असं समरजितसिंह घाटगे म्हणाले.

Jayant Patil On Raje Samarjeetsinh Ghatge
देवेंद्र फडणवीस, समरजितसिंह घाटगे, जयंत पाटील, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“जयंत पाटील दुसऱ्याच्या प्रचाराला आले हे बघायलाच..”

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी जयंत पाटलांवर मिश्किल टिप्पणी केली. “कागललाही हे बघायला मिळतंय की जयंत पाटील दुसऱ्यांसाठी इथे आलेत. थोडंसं तुमची भाषणं बघून तुमच्यासारखं बोलायला शिकतोय. इथे लोक तुम्ही आल्याच्या उत्सुकतेपेक्षा दुसऱ्याच्या प्रचाराला तुम्ही आले आहात हे बघायला आले आहेत”, अस समरजितसिंह घाटगे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Story img Loader