मागील काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद सुरू आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. दरम्यान, आता ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्यपातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा- VIDEO : ‘महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातलाच का जातात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले, “पंतप्रधान मोदींचं…”

Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?

“इतिहासाची मोडतोड करून प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाला माझा विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट यायलाच हवेत, याबाबत दुमत नाही. मात्र, आज अनेक चित्रपट येत आहेत, ज्यात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असल्याचे सिद्ध झाले आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी दिली. “आज जो इतिहास आपण दाखवू पुढची पिढी तोच इतिहास घेऊन पुढे जाईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मोर्चात गर्दी जमवण्यासाठी ‘मविआ’ने पैसे वाटले? भाजपा नेत्याने थेट VIDEO केला शेअर

“राज्य सरकारने इतिकारांची समिती नेमावी”

“हरहर महादेव चित्रपटाला सेंन्सर बोर्डाची परवानगी मिळाली आहे. मात्र, सेंन्सर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. या बोर्डात नेमके कोण इतिहासकार आहेत, माहिती नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्यपातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी. चित्रपटांची पहिली स्क्रिनींग महाराष्ट्रात करून पुढे ते सेंन्सर बोर्डाच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवावे”, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – “संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी!

“असा इतिहास नवीन पिढीने बघायचा का?”

“हर हर महादेव चित्रपटात जेधे देशमुख आणि बांदल देशमुख यांच्यात वाद दाखवण्यात आला आहे. मात्र, इतिहासात हा वाद कुठेच नाही. ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं, त्यांच्यात असा वाद दाखवणं योग्य नाही. हाच इतिहास पुढच्या पिढीने घ्यायचा का? बाजीप्रभू देशपांडेंची लढाई ही शिवाजी महाराजांवर झाली, कोणता इतिहास आहे? हा इतिहास नवीन पिढीने बघायचा का? शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील महिलांना सन्मान दिला. मात्र, हर हर महादेव चित्रपटात स्रियांचा बाजार लावण्यात आला आहे. हे शोभत नाही. हे आपण पुढच्या पिढीला दाखवणार आहोत का?” असंही ते म्हणाले.