सनातन संस्थेच्या विरोधात जनमत कलुषित करण्याचा प्रयत्न डॉ.भारत पाटणकर यांनी चालवला असून आता तर डॉ.पाटणकर यांच्या फेसबुक अकाउंटवरून सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याचे आवाहन फेसबुक अकाउंटवर केले आहे. याबाबत पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करावी आणि पाटणकर यांच्या पोस्टला प्रतिसाद देणारे राम खंडागळे यांना अटक करावी, अशी मागणी सोमवारी सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली.
येथे आठवडाभर पुरोगामी आणि प्रतिगामी संघटनांमध्ये संघर्ष सुरू आहे. पुरोगामी संघटनांनी मानलेल्या विचाराला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी सायंकाळी सनातन संस्थेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावास्थळी जाण्यापूर्वी सनातन संस्थेचे शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक डॉ.शर्मा यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनामध्ये पाटणकरांच्या फेसबुक अकौंटवर सनातन संस्थेविषयी कोंिबग ऑपरेशन करण्याच्या विधानाला आक्षेप घेतला आहे. तसेच राम खंडागळे नावाच्या व्यक्तीने वर्तकना गोळ्या घालाव्यात, अशी पोस्ट केली आहे. त्यावर पाटणकर यांनी प्रतिक्रिया न देता हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप सनातनने केला आहे. यातून समाजाला गुन्हेगारी कृत्य करण्याचे संदेश उघडपणे दिले जात आहेत. त्यामुळे खंडागळेस शोधून काढून अटक करावी, त्यांना तडीपारीसारखे कठोर उपाय योजावेत. तसेच पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हा बंदी, भाषण बंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा