कोल्हापूर : देशामध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ जागांवर विजय मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी रात्री व्यक्त केला.सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली खासदार संजय राऊत हे रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात आले होते . यावेळी पत्रकाराची संवाद साधताना ते म्हणाले , गेल्या २ दिवसात मी सांगलीत आहे.त्यामुळं इचलकरंजीला चक्कर टाकायची ठरवली.आम्ही तिन्ही पक्षांनी ४८ मतदारसंघात जबाबदारी सांभाळायची ठरलं आहे.तरीही शेट्टीशी जमलं असतं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू  शेट्टी यांच्याशी आम्ही चर्चा केली. आम्ही राजू शेट्टीना महाविकास आघाडीत सामील व्हावं अस आवाहन केले होते. राजू शेट्टी लढणारा माणूस आहे.मात्र त्यांनी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिला. त्यांच्या पक्ष संघटनेचे अस्तित्व ठेवून ही ते आमच्याकडून लढू शकले असते, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा >>>गडहिंग्लजचे नेते अप्पी पाटील काँग्रेसमध्ये; हजारो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश

हातकणंगले सेना जिंकणार

माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या उमेदवारी नंतर लोक वाट पाहत आहेत. हातकणंगले मधून तगडा उमेदवार द्यावा अस ठरलं. आणि त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करून सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित झाली.जिथं जिथं गद्दारी झाली तिथं गद्दाराला डोकं वर काढू द्यायचं नाही. या मतदारसंघातून निष्क्रिय खासदार पुन्हा निवडून जाणार ।नाहीत, अशी टीका त्यांनी शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर करून सत्यजित पाटील २ ते अडीच लाख मत घेतील, असा विश्वास व्यक्त केला.आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. जागा वाटपावरून मतांतर असले तरी दुरावा होणार नाही असेही त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

मुश्रीफ, मानेंनी पाणी प्रश्न सोडवावा

इचलकरंजी महापालिके अंतर्गत सुळकूड पाणी प्रश्न प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत म्हणाले,खासदार माने यांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी होती.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर रक्ताचे पाट वाहतील अस वक्तव्य केलं होतं.त्यांचा एक पाय तुरंगात होता, त्यांच्याकडून याविषयी उत्तर घ्यायला हवे.

मुश्रीफ यांचा तेरावा अवतार आला तरी…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक यांचा पराभव परमेश्वर आला तरी होऊ शकणार नाही, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, हसन मुश्रीफ यांचा परमेश्वर म्हणजे विष्णूचा तेरावा अवतार आहे. ते आले तरी शाहू महाराज निश्चितपणे विजयी होतील, असे नमूद करून राऊत यांनी मुश्रीफ यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले.

सीमावासीयांना पाठवत

सीमा भागात एक मराठी माणसाचा आवाज बुलंद व्हावा अशी आमची भूमिका आहे. आज सकाळीच सांगलीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी भेटले. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे , असेही राऊत म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पर्सनल लॉ बदलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ही भूमिका ठाकरे सेनेला मान्य आहे का, असा प्रश्न शिंदेसेनेने केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मी काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलेला नाही . पण इंडिया आघाडी व महाविकास आघाडी यांचा वेगळा जाहीरनामा असेल.त्यातून भूमिका स्पष्ट होईल.