राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आज ( २ मे ) पार पडला. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शरद पवारांनी मोठा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. शरद पवारांच्या या निर्णयानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी भाष्य करत हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

सरोज पाटील यांनी सांगितलं, “हा निर्णय अतिशय वेदनादायक आणि धक्का देणारा आहे. सध्या देशात अराजकता माजली आहे. लोकशाही जगती की नाही, असा प्रश्न पडला आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय. अतिशय अस्वस्थ असं वातावरण असताना अचानक शरद पवारांनी राजीनामा दिल्याने खूप मोठा धक्का बसला आहे.”

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!

हेही वाचा : “सुप्रिया, तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, अजित पवारांनी रोखलं; नेमकं काय घडलं?

“शरद पवारांनी कठीण परिस्थितीत आपला पक्ष सांभाळला आहे. सर्व सहकारी सोडून गेले, तरी ते डगमगले नाहीत. देशात परिस्थिती भयंकर आहे. ईडीचं संकट असून, संविधान पायदळी तुडवलं जातंय. अशावेळी शरद पवारांची गरज आहे. त्यांच्याइतका खंदा विरोधी पक्षनेते कोणी दिसत नाही. कितीही टीका केल्यावर त्यांनी कधीही वाईट शब्दांत उत्तर दिलं नाहीत. पण, शरद पवारांनी राजीनामा दिल्याने अतिशय दु:ख वाटत आहे. त्यांनी तो राजीनामा परत घ्यावा,” अशी विनंती सरोज पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा : “शरद पवार आत्ताच निवृत्त होत आहेत, याचा अर्थ…”, भाजपा नेत्याचं विधान

“शरद पवारांची प्रकृती ठिक नाही, वय वाढत आहे. पर्यायी माणूस तयार व्हावा, असं त्यांचं मत आहे. मात्र, त्यांनी आधी पर्यायी माणूस तयार करावा, मग खुर्ची सोडावी. तुमच्यासारखा अजूनही नेता दिसत नाही. याने महाराष्ट्राचं नुकसान होईल. तसेच, राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल,” असेही सरोज पाटील म्हणाल्या.