पवार कुटुंबियात कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवार यांच्या मागे महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. त्यांचा पराभव करणे शक्य नाही, असे मत शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत देणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शिरोळ तालुक्यातील मात्तबर पाटलांच्या उमेदवारीच्या दाव्याने कृष्णाकाठचे राजकारण गतिमान

या घटना बाबत बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, पवार कुटुंबियांमध्ये कोणतेही वाद नाहीत. शरद पवार व माझ्या आई या शेकापच्या होत्या. शरद पवार हे यांनी हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. एन. डी. पाटील यांनी शेकापचे काम पाहिले. तरीही  आमच्या कुटुंबात मतभेद कधीच झाले नाहीत. आताही अजित पवार वेगळे असले तरी कुटुंबात मतभेद होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. शरद पवार यांना पराभूत करणे हे आमचे ध्येय आहे, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर पाटील म्हणाल्या, शरद पवार यांनी मोठे काम केले आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील हे त्यांचा पराभव करायची भाषा करत असले तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला  किंवा अयोध्यातील मंदिरात नवस केला तरी शरद पवार हेच जिंकतील. सुप्रिया व सुनेत्रा या दोघीही स्वभावाने चांगल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saroj patil supports brother says not possible to defeat sharad pawar zws
Show comments