लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ यांना टाळी देण्यास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी नकार दिला. यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ व सतेज पाटील या खासा दोस्ताना असलेल्या दोन प्रमुख नेत्यांच्या वाटा वेगळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्यावर गेल्या आठवड्यात त्यांनी सतेज पाटील यांनी सोबत यावे; तरच त्यांच्याशी मैत्री राहील, अशा शब्दात टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील ‘मुश्रीफ यांनी सोबत येण्याचे आवाहन केले असले तरी मी महायुती सोबत जाणे शक्य नाही,’ अशा शब्दात टाळीस प्रतिसाद देण्याचे टाळले.

आणखी वाचा-कोल्हापूर : धार्मिक पेहरावाच्या मुद्द्यावरून इचलकरंजीतील महाविद्यालयात दोन समाजाच्या समर्थकांत वाद

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री फलक लावले गेले आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूरच्या जनतेच्यावतीने दोन्ही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे नाही तर दिल्लीत होतो. दिल्लीकरांच्या मनात काय चालले आहे; यावरच गोष्टी ठरतात’, असा खोचक टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले असली तरी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. देशाच्या आणि राज्यात राजकारणात काँग्रेस विश्वास देऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.