लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात प्रथमदर्शनी गौडबंगाल, घोटाळा झाल्याचे दिसत आहे, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेचे काम अलीकडेच पूर्ण झाले आहे. या कामावरून रविवारी कोल्हापूर विमानतळ लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांना उद्देशून टीका केली होती. या योजनेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यानुसार आज खासदार महाडिक, सत्यजित कदम, भाजप – ताराराणी आघाडीचे नगरसेवक, कार्यकर्ते यांनी पुइखडी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन या योजनेच्या कामाबाबत पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आणखी वाचा-मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार, काँग्रेसने आजवर केवळ पोकळ स्वप्ने दाखवली; खासदार धनंजय महाडिक
हसन मुश्रीफ नाराज
यानंतर पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले, काळम्मावाडी योजनेचे पाणी जलशुद्धी कोल्हापुरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आले आहे. ते नागरिकांच्या नळापर्यंत जाण्यासाठी वितरण व्यवस्था अस्तित्वात नाही. यावरून शहरांमध्ये पाणी उपलब्धतेबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये मला लक्ष घालावे लागणार आहे. या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेच्या कामाचा श्रेय घेण्याचा बालीश प्रयत्न केला गेला. त्यावरून विद्यमान पालकमंत्री नाराज झाले आहेत, असेही महाडिक म्हणाले.