भाविकांच्या विरोधाला न जुमानता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करून अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शनानंतर भाविकांची देसाईंचा तीव्र निषेध करत धक्काबुक्की केली आणि मारहाणही करण्यात आली. देसाई यांना भाविकांच्या तावडीतून सोडवताना पोलिसांची तारांबळ उडाली. धक्काबुक्की आणि मारहाणीमुळे तृप्ती देसाई बेशुद्ध पडल्या. त्यांना रुईकर कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पंधरा मिनिटांनी त्या शुद्धीवर आल्या. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देसाई मंदिराच्या गाभाऱयात जाऊन दर्शन घेणार असल्यामुळे महालक्ष्मी मंदिराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. दर्शनासाठी देसाई यांनी साडी परिधान करून यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आणि श्रीपूजकांचा विरोध झुगारून देसाई यांनी तब्बल चार तासांच्या बाचाबाचीनंतर चुडीदार परिधान मंदिरात प्रवेश केला. यावेळी देसाई यांना गाभाऱयात घेऊन जाण्यात पोलिसांनीची पुढाकार घेतल्याचा आरोप स्थानिक आणि हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा