कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरात काल दुपारी सुजल बाबासाहेब कांबळे या तरुणाचा पाठलाग करून टोळक्याने खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी शीघ्र तपास करून सहा आरोपींसह एक विधी संघर्ष ग्रस्त बालक ताब्यात घेतले. सहा आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल दुपारी टिंबर मार्केट येथील मारुती मंदिराजवळ मित्रांसमवेत बोलत बसलेल्या सुजल कांबळे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या आठ ते नऊ जणांनी तलवारी सारख्या धारदार शस्त्राचे वार केले होते. पाठलाग करून त्याचा खून करून ते पळून गेले होते.

आणखी वाचा-प्रवाशांना दिलासा; अनुस्कुरा घाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू

या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपासाच्या सूचना केल्या होत्या .त्यानुसार पोलिसांनी तातडीने शोध घेऊन बारा तासातच आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये ओमकार राजेंद्र पवार, आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी, आशिष सुकेश भाटकर, तेजस उर्फ पार्थ राजेंद्र कळके, श्रवण बाबासाहेब नाईक ,सादिक जॉन पीटर तसेच एक विधी संघर्ष बालक यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven accused arrested within 12 hours in kolhapur young man murder case mrj
Show comments