कोल्हापूर : शहरालगतच्या रासायनिक कंपनीस शनिवारी भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोल्हापूर शहरालगत गोकुळ शिरगाव एमआयडीसी आहे. येथे सेराप्लेक्स युनिट नावाची कंपनी आहे. येथे रासायनिक उत्पादने तयार होतात. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीत आग लागली. रासायनिक ज्वलनशील घटक असल्याने आग क्षणार्धात भडकत गेली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट यामुळे आगीची भीषणता दिसत होती.

Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले
fire erupted late Sunday night in second floor room of six storey in balkoom area Thane
बाळकूम भागात एका इमारतीत आग, ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्तपणे लढण्यावर महाविकास आघाडीत ऐक्य

दूरवरील राष्ट्रीय महामार्गावरूनही आग जाणवत होती. आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. सवरलेले कर्मचारी, शेजारील तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी पाण्याचा मारा करून आग विजवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात महापालिका, विमानतळ, औद्योगीक वसाहत, खाजगी कंपनी यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा सुरू ठेवला. रासायनिक पदार्थ असल्यामुळे आग आटोक्यात आणणे अडचणीचे होत होते. त्यात बघायचा अडथळाही येत राहिला. अखेर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तरीही ती धुमसत होती.

हेही वाचा – राजकीय नेत्यांनंतर आता मुंबई महापालिकेचे अधिकारी सोमय्यांच्या रडारवर? गंभीर आरोप करत म्हणाले, “करोना काळात…”

आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आगी मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी दाखल झाले होते.

Story img Loader