कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील विजय हा जनतेचा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू महाराज यांनी विजयानंतर व्यक्त केली. तर, खासदार धैर्यशील माने यांनी सर्वसामान्य मतदारांनी मला दिलेल्या प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच ही निवडणूक दुसऱ्यांदा जिंकता आली, अशा भावना व्यक्त केल्या.

शाहू छत्रपती म्हणाले, निवडणूक जनतेने हातात घेतल्याने सर्व विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळालेले आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, इंडिया आघाडी , महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. हा विजय पाण्यासाठी पी. एन. पाटील आज हयात नाहीत. गड आला पण सिंह गेला याचे दुःख वाटते अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…कोल्हापुरात शाहू महाराजांचा दीड लाखावर मताधिक्याने विजय, संजय मंडलिक पराभूत

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नेतृत्व विजयाचे श्रेय दीड लाखाहून अधिक मताधिक्य देणाऱ्या मतदारांचा असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा विचार श्रीमंत शाहू महाराज यांच्या रूपाने नवी दिल्लीत जाणार असल्याने त्याचा आनंद आहे. काँग्रेस, महाविकास – इंडिया आघाडीला हा विजय प्रेरणा देणार आहे. आज पी. एन. पाटील हयात असते तर आनंद द्विगुणीत झाला असता. त्यांचे स्मरण करणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : हातकणंगलेत उत्कंठावर्धक मतमोजणीत धैर्यशील माने यांची बाजी

विजयानंतर खासदार धैर्यशील माने म्हणाले, माझ्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्व नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे. सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सतर्क राहू. माझ्या विजयासाठी कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण देशामध्ये थोडीशी एक प्रकारची लाट दिसून आली. साहजिकच या वातावरणाचा परिणाम कोल्हापूर मतदारसंघावर झाला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला असून तो स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. माझ्या कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात मंडलिक यांना १५ हजारांवर मताधिक्य मिळाले आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे ८० हजारांचे मताधिक्य मिळू शकलेले नाही, याची खंत वाटते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणाने चांगली कामगिरी केली जाईल. पराभवाचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणही केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader