कोल्हापूर : लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज हे शककर्ते शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचा आचार – विचार घेऊन कार्य करत आहेत. खासदार निवडताना खबरदारी घ्यावी याचा विचार करायला हवा. त्यामुळे जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज हेच सक्षम उमदेवार भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील सडोली खालसा जिल्हा परिषदेतील हसूर दुमाला, भाटणवाडी, सोनाळी, पाटेकरवाडी, म्हालसवडे, कांचनवाडी गावच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी तेजस्विनी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती पुढे म्हणाल्या, शाहू महाराज यांनी समतेचा विचार कायम ठेवून पुरोगामित्व कायम राखले आहे. योग्य वेळ आली की आपली भूमिका मांडण्यात कधीच मागे राहिले नाहीत. त्यांच्या अभ्यास व अनुभवाचा निश्चित फायदा होणार आहे. संभाजीराजे छत्रपती असताना अनेक विकासकांमासाठी गावागावात निधी दिला. शहरातील अनेक महत्वाचे विषय मार्गी लावण्यात प्रभावी काम केले आहे.
हेही वाचा – ‘स्वाभिमानी’कडून लढून लोकसभा निश्चितपणे जिंकू; राजू शेट्टी यांचा विश्वास
दिल्लीत सर्वात प्रथम शिवजयंती साजरी करण्याचे कार्य संभाजीराजे व कोल्हापुरांचे आहे. रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळ्यातून शिव- शाहूंचे विचार रुजविण्याचे कार्य सुरु आहे. आपण सर्व जण या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही केले.