कोल्हापूर : शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांची आज येथील नवीन राजवाड्यात भेट झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शाहू महाराज यांना जाहीर झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले. तर खाजगी चर्चेमध्ये शाहू महाराज यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या सभांमध्ये प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा गेली महिनाभर सुरू होती. ठाकरे सेनेनेही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. गेले दोन-तीन दिवस शाहू महाराज यांनाच उमेदवारी मिळणार याची संकेत मिळत होते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नवीन राजवाडा येथे शाहू महाराज यांची भेट घेतली असता शाहू महाराजांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा…कोल्हापूर: शरद पवार यांचा पराभव करणे शक्य नाही –  सरोज पाटील

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यात ऋणानुबंध होते. ते या पिढीत आणि पुढच्या पिढीतही कायम राहतील असा निर्वाळा त्यांनी दिला. महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक ताकतीने प्रचार करून त्यांना विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेचा प्रश्नही असणार आहे. शाहू महाराज यांच्या प्रचार सभेला आणि विजय सभेला मी येणार आहे.

या निमित्ताने मी माझा स्वार्थ साधला आहे, असा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, आम्ही सगळे या निवडणुकीत एका विचाराने लढत आहे. त्यासाठी शाहू महाराज यांचे आशीर्वाद पाहिजे होते. ते घेऊन आता पुढे प्रचाराला निघालो आहे. शाहू महाराजांची भेट झाल्याने आज मनापासून आनंद झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे यापूर्वी शाहू महाराजांना भेटले होते. मी ही पुढे येत राहीन.

हेही वाचा…शिरोळ तालुक्यातील मात्तबर पाटलांच्या उमेदवारीच्या दाव्याने कृष्णाकाठचे राजकारण गतिमान

यावेळी उद्धव ठाकरे तेजस ठाकरे उध्दव ठाकरे, युवा नेते तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, यांचे स्वागत शाहू महाराज व मालोजीराजे छत्रपती यांनी केले. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रवीकिरण इंगवले पदाधिकारी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu maharaj may do campaigning for maha vikas aghadi in maharashtra lok sabha elections psg
Show comments