कोल्हापूर : धरणांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या आजरा तालुक्यातील विस्थापित लोकांच्या पुनर्वसित जमिनी पुन्हा शक्‍तीपीठ महामार्गासाठी काढून घेतल्या जाणार आहेत. शक्‍तीपीठ तर कोल्हापुरात आहे. तेथे जायला कोणत्याही भाविकाने या शक्‍तीपीठ महामार्गाची मागणी केलेली नाही. शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे पाप सत्ताधार्‍यांनी करू नये. शेतकर्‍यांना उध्वस्त करणार्‍या या महामार्गविरोधी लढ्यात शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्‍वास संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित खेडे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. भर उन्हात निघालेल्या पद यात्रेमध्ये ग्रामीण भागातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यावेळी शाहू महाराजांच्या जयघोष करण्यात आला. इंडिया आघाडी ,, महाविकास आघाडीचे तसेच मित्र पक्षांचे कार्यकर्ते , पदाधिकारी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.

हेही वाचा…नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, तालुक्यामध्ये ठीक-ठिकाणी झालेल्या पाणी प्रकल्पांमध्ये शेतकर्‍यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रसंगी स्वतःची घरदारे सोडून विस्थापित झालेली ही मंडळी आता कुठे स्थिरस्थावर होत असताना शक्‍तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे.

एकदा विस्थापित झालेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी पुन्हा एकदा शक्‍तीपीठ महामार्गासाठी संपादित होण्याची शक्यता आहे. गरज नसलेल्या या मार्गाकरिता विस्थापितांच्या दृष्टीने जमीन संपादन हे अन्यायकारक आहे. शेतकरी आता जागरूक झाला आहे. या महामार्गाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. शेतकर्‍यांच्या या लढ्यात आपण अग्रभागी असू.विकासाच्या नावावर गरज नसताना कोट्यावधी रूपये उधळण्याचा हा सरकारचा डाव संघटितरित्या हाणून पाडूया असेही त्यांनी आवाहन केले.

हेही वाचा…खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका

भाजप चळवळी दडपत आहे

यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, या देशातील लोकहिताचे नवनवे कायदे कष्टकरी जनतेने लढून करायला भाग पाडले आहेत. पण भाजप आणि मित्र पक्षांचे हे सरकार चळवळी दडपून टाकत आहेत. म्हणूनच आम्ही दडपशाही करणार्‍या या सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बाजूने उतरलो आहोत. इंडिया आघाडीचे सरकार चळवळींची दखल घेणारे असेल याचा आम्हाला विश्‍वास आहे. सर्वसामान्यांच्या विरोधात धोरणे लादणार्‍या मोदी सरकारला सत्तेवरून हटवायचे असेल तर शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा…

यावेळी मुकुंदराव देसाई, उदय पवार, संतोष मासोळे, रणजित देसाई, शांताराम पाटील, राजू होलम, रणजित देसाई, शिवराज देसाई, संकेत सावंत, संतोष पाटील, गंगाराम ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.