शरद पवार यांची भाजप-शिवसेनेवर टीका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांचे कौतुक करतानाच राज्यातील सेना भाजपमधील भांडणाला ‘सत्तेला चिकटलेले मुंगळे’ अशी उपमा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपबद्दल प्रेम आणि विरोध असे दोन्ही भाव येथे प्रगट केले. भाजपबद्दल अशी मिश्र भूमिका ठेवत पवारांनी त्यांच्या राजकीय चालीविषयीचे गूढ कायम राखले.
भारताने अणुपुरवठादार राष्ट्र गटाचा (एनएसजी) सदस्य व्हावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना पवार म्हणाले, की भारताला हे सदस्यत्व मिळवण्यात अपयश आले तरी आजवरचे हे चांगले प्रयत्न होते. नरसिंहराव, मनमोहनसिंग यांच्या काळापासून भारताचे याबाबतीत प्रयत्न सुरू आहेत. नकाराधिकार असलेल्या एकदोन देशांच्या विरोधामुळे भारताला आतापर्यंत मागे राहावे लागले. हे चित्र एकदम बदलणारे नसले, तरी मोदी यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
मोदींच्या धोरणांचे कौतुक करताना पवारांनी राज्यातील युती सरकारवर मात्र जोरदार टीका केली. ते म्हणाले, की शिवसेना आणि भाजपमधील वादात कुणीही घटस्फोट घेणार नाही. कारण हे सत्तेला चिकटलेले मुंगळे आहेत. टीकेतून केवळ त्यांच्याकडील समृद्ध शब्द भांडाराचे दर्शनच आपल्याला यापुढे होत राहील. पुण्यातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या कार्यक्रमाला महापौरांना निमंत्रित न करण्याच्या प्रकारावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या घटनेतून राज्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नसल्याचे दुर्दैवाने पाहायला मिळाले. रिजव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याविषयी वाचाळ वक्तव्य करणाऱ्यांना सत्तेतील पक्षाने अटकाव करण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले.