कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व राहिले. नागपूर अपवाद वगळता निवडणूक बिनविरोध झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ६० वर्षांत ही निवडणूक बिनविरोध होण्याची पहिलीच वेळ आहे .त्यामध्ये एकुण २५ जागांपैकी नागपूर विभाग वगळता २३ जागांवर सदर निवडणूक बिनविरोध झाली. त्यासाठी उपुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रवीण दरेकर, अंकुश काकडे, आमदार अशोक चव्हाण अशा सर्वपक्षीय नेते मंडळींचे सहकार्य लाभले. गेली ५ वर्षे संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले व्ही.बी. पाटील यांनी यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी विद्यमान संचालकांचेदेखील सहकार्य लाभले. पुणे विभागाच्या चार संचालकांमधून व्ही.बी.पाटील बिनविरोध झाले.

हेही वाचा – विद्यार्थी २०२४ च्या निवडणुकीत दिवे लावतील; अजितदादांना खरमरीत प्रत्युत्तर

बिनविरोध निवडी याप्रमाणे – सर्वसाधारण अ वर्ग सभासद प्रतिनिधी मुंबई विभाग

१. प्रकाश यशवंत दरेकर
२. सिताराम बाजी राणे
३. ॲड दत्तात्रय शामराव वडेर

सर्वसाधारण अ वर्ग सभासद प्रतिनिधी नाशिक विभाग

१. प्रथमेश वसंत गीते
२. ॲड. वसंतराव पंढरीनाथ तोरवणे
३. डॉ. सतीशराव भास्करराव पाटील
४. विजय शिवाजीराव मराठे

सर्वसाधारण अ वर्ग सभासद प्रतिनिधी पुणे विभाग

१. विश्वास बाजीराव पाटील (व्ही.बी.पाटील)
२. सागर उल्हास काकडे
३. शिवाजीराव रामचंद्र शिंदे
४. श्रीमती वृषाली ललित चव्हाण

सर्वसाधारण अ वर्ग सभासद प्रतिनिधी औरंगाबाद विभाग

१. सुनील देविदास जाधव
२. दिलीप बाबुराव चव्हाण
३. हरिहरराव विश्वनाथराव भोसीकर
४. जयसिंग शिवाजीराव पंडित
५. रवींद्र देवीकांतराव देशमुख

सर्वसाधारण अ वर्ग सभासद प्रतिनिधी अमरावती विभाग

१. दीपक शेषराव कोरपे
२. नितीन तुळशीदास भेटाळू

हेही वाचा – दुष्काळ फटका; भोगावती नदीची पाणी पातळी घटली, कोल्हापूरचा पाणीपुरवठा खंडित

महिला राखीव प्रतिनिधी

१. श्रीमती जयश्री मदन पाटील
२. शैलजा सुनील लोटके

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

वसंतराव विश्वासराव घुईखेडकर

अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी

सिद्धार्थ तातू कांबळे

भटक्या विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी

बाळासाहेब महादू सानप

नागपुरात लढत

तर नागपूर विभागाची निवडणूक लागली असून त्यामध्ये

१.त्र्यंबक शंकरराव खरबीकर
२.विनोद बाबाराव ढोणे
३.राकेश मुकुंदरावजी पन्नासे
४. डॉ. महेश देवराव भांडेकर

या ४ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असून त्यासाठी २४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group dominates maharashtra state co operative housing finance corporation election unopposed except nagpur ssb