कोल्हापूर : मी आजवर स्वबळावरच राज्याचा चार वेळा मुख्यमंत्री झालो आहे, पण हा इतिहास कोणाला माहिती नसेल तर त्याला मी काय करू, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे सहकारमंत्री आणि राष्ट्रवादीच्या बाहेर पडलेल्या गटातील एक ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे जिल्ह्यात एका सभेत बोलताना वळसे यांनी नुकतीच पवारांवर टीका करताना त्यांच्या नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या मर्यादेवर बोट ठेवत टीकास्त्र सोडले होते. यामध्ये त्यांनी पवारांना किंवा त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील जनतेने एकदाही संपूर्ण सत्ता किंवा बहुमत दिले नसल्याची टीका केली होती. हे बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू यांच्या प्रादेशिक पक्षांनी मागून येत राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली. असे यश पवारांना मिळवता आले नसल्याची टीका वळसे यांनी केली होती. वळसे यांनी केलेल्या या टीकेवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली होती. वळसे यांनी केलेल्या आरोपांना पवारांनी तब्बल आठवडाभराने माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

पवार म्हणाले, की राष्ट्रवादी पक्षाकडून नसलो तरी यापूर्वी अन्य पक्षांच्या मदतीने मी राज्यात चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ घेतली म्हणजे मला महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा होता असाच अर्थ होतो. परंतु हा इतिहास कोणाला माहिती नसेल, तर त्याला मी काय करू, अशा शब्दांत पवारांनी वळसे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भुजबळ, मुंडे, मुश्रीफ यांच्या पाठोपाठ पवार यांनी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते वळसे-पाटील यांच्यावरही टीका केली.

शाहूमहाराजांचे निवडणुकीसाठी स्वागत

कोल्हापुरातील शाहूमहाराज हे लोकसभा निवडणुकीसाठी तयार असतील, तर आम्ही त्याचे स्वागतच करू असा उल्लेख करतानाच पवार यांनी तथापि त्यांनी माझ्याशी बोलताना निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले असल्याचाही खुलासा केला. दरम्यान, राज्यातील दौऱ्यात दिसून आलेल्या राजकीय वातावरणाबद्दल बोलताना पवार म्हणाले, की लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी दिसत आहे. यामुळे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.