कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरच्या मध्यास होणा आहे. त्यापूर्वी तालुका निहाय सभा घेऊन गोकुळ दूध संघातील गैरकारभाराचा पाढा वाचला जाणार आहे, असे गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. गोकुळ दूध संघातील कारभाराविरोधात महाडिक यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली होती. त्या आधारे गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अधिकारी नियुक्त करून काम सुरू केले होते. त्या विरोधात गोकुळ संचालक मंडळांने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका काल न्यायालयाने फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 न्यायालयाचे या निर्णयाचे स्वागत करून महाडिक म्हणाल्या, आता चौकशीचे काम सविस्तरपणे चालणार असल्याने किती कालावधी लागेल हे आता सांगता येणार नाही. त्यामधून अनेक गैर कारभारावर उघडकीस येतील असा विश्वास आहे. गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी निविदा न मागवता काम करणे,  बिला पेक्षा अधिक रक्कम देणे, नियमांचे उल्लंघन करून कामे करणे असे अनेक गैरप्रकार केले असल्याचे सविस्तर पुरावे शासनाकडे सादर केले आहे.  त्याचाही या चौकशीतून उलगडा होईल.