लोकसत्ता प्रतिनिधी
कोल्हापूर : विश्व हिंदू परिषद स्थापनेचे षष्ठीपूर्ती हीरक महोत्सवी वर्ष व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष या अनुषंगाने भारतभर शिव शौर्य जागरण रथयात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रथयात्रेची सुरुवात झाली असून ती १३ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
आणखी वाचा-अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड काढण्यावरून वादावादी; नवरात्रीत विषय तापला
११ ऑक्टोबर रोजी महाराजांचा रथ शिरोली पुलाची येथे येणार आहे. तेथून हा रथ १२ ऑक्टोबर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, बोरगाव , खंचनाळ, कुरुंदवाड मार्गे प्रवास करून शिरढोण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजी इचलकरंजी येथे श्री नरसिंह भगवान मंदिर येथून मिरवणूक विविध भागातून निघणार आहे. सायंकाळी श्री विठ्ठल रामजी शिंदे शाळा येथेमहंत श्री दादा महाराज गोसावी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे ,असे निवेदन विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल विभाग संयोजक सोमेश्वर वाघमोडे, जिल्हा मंत्री सुजित कांबळे ,जिल्हा सहमंत्री मुकेश दायमा, इचलकरंजी शहर अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांनी मंगळवारी केले.