शिवसेना स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शिवसेनेतर्फे शहरातून दुचाकी भगवी रॅली काढण्यात आली. फडकणारे भगवे ध्वज घेतलेल्या शिवसनिक जय भवानी.. जय शिवाजी..’ ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. ’ असा जयघोष करत होते.
अशा उत्साही वातावरणात शिवसेनेतर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून शनिवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. निमित्त होतं शिवसेना पक्षस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी दिनाचे. यानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार चंद्रदीप नरके, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुग्रेश लिंग्रस, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख राहुल खेडेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राजारामपुरी येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली जल्लोषी वातावरणात राजारामपुरी मेन रोड, बागल चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी-फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोìडग, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौकमाग्रे ही रॅली छत्रपती शिवाजी चौक येथे येऊन तिचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत साखर-पेढे वाटण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुख व शिवसेनेच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. या रॅलीत तीनशेहून अधिक मोटारसायकलींसह शिवसनिक सहभागी झाले होते.
पक्षस्थापना दिनानिमित्त दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले. रंकाळा स्टॅँड येथे रिक्षांचे दरवाजे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बिंदू चौक येथे शिवसेनेच्या शाखेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पद्मा चौक येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालय परिसरात केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, विनायक साळोखे, शैलेश पुणेकर, विराज पाटील, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, किरण पडवळ, शशी बिडकर, राजू यादव, दत्ता टिपुगडे, राजू हुंबे, अभिजित बुकशेठ, रणजित आयरेकर, कमलाकर जगदाळे आदी उपस्थित होते.

Story img Loader