शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात गुरुवारी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात येऊन तेथील चौकात महाआरती करण्यात आली. मंदिराविषयीची प्रशासनाची गळचेपी सहन केली जाणार नाही असा इशारा देऊन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रथम शहरातील अनधिकृत बांधकामे हटवावीत, अशी मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात िहदुत्ववादी संघटनांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असून या अंतर्गत गुरुवारी शिवसनिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या शहर कार्यालयापासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये ‘महापालिका अधिकाऱ्यांना लागले वेध, पसरू पाहतात जातीय तेढ’, ‘मंदिरांना हात लावाल तर याद राखा, िहदू धर्मीयांची गळचेपी करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी मार्ग दणाणून सोडला. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्चा आल्यानंतर घंटानाद करण्यात आला. महापालिकेतील विठ्ठल रामजी िशदे चौकातील गणेशमंदिरासमोर महाआरती करून महापालिका अधिकाऱ्यांना सुबुद्धी देण्याचे साकडे घातले. उपायुक्त नितीन देसाई यांना निवेदन दिले.
या वेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरामध्ये अनधिकृत स्वरूपाची बांधकामे बोकाळली असताना त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करून िहदू धर्माच्या श्रद्धास्थानांना लक्ष करीत आहेत. अधिकाऱ्यांची ही कृती शिवसेना खपवून घेणार नाही, िहदू धर्मीयांच्या मंदिराबाबत घाई करणारे प्रशासन इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कारवाई करण्यात कुचराई करीत आहेत. यामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रा.विजय कुलकर्णी, शिवसेना गटनेता नियाज खान, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुग्रेश िलग्रस यांच्यासह शिवसनिक सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा