इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डेंगीचा फैलाव वाढत आहे. स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडाला असून डेंगीमुळे मयत झालेल्यांच्या वारसांना नगरपालिका प्रशासनाने प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावेत, यासह नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी शनिवारी इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी पालिकेच्या प्रवेशद्वारात आणि नगराध्यक्षांच्या दालनात शंखध्वनी करण्यात आला.
शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाकडून आखल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच दिसत आहेत. डेंगीमुळे तिघांचा मृत्यू झाला असून त्याला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आणि डेंगीमुळे मयतांच्या वारसांना आíथक मदत मिळावी यासाठी आज पुन्हा मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅली पालिकेत आल्यानंतर प्रवेशद्वारात निषेधाच्या घोषणा देत प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी करण्यात आला. त्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मलकारी लवटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना निवेदन सादर केले. चच्रेवेळी महादेव गौड आणि आरोग्याधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. गौड यांनी आरोग्य आणि पाणी प्रश्नाला प्राधान्य देत निधी खर्च करण्याची गरज असताना बांधकाम खात्यावर का पसे उधळले जात आहेत असा सवाल करत बांधकाम खात्यात भ्रष्टाचार माजल्याचा आरोप केला. चच्रेअंती नगराध्यक्ष बिरंजे यांनी मयतांच्या वारसांना अनुदान देण्यासंदर्भात पालिकेने ठराव करून तो शासनाकडे पाठविला आहे. पालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा