कोल्हापुरातील सरकारी कार्यालयातील अधिका-यांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करत गुरुवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. कोल्हापुरातून निवृत्त झालेल्या अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सनी यांना सादर करण्यात आले.
कोल्हापुरातील विविध शासकीय कार्यालयात अनेक वष्रे राहून भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत. अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय कोणतेही काम सरकारी कार्यालयात होत नाही. अर्थपूर्ण व्यवहार करणा-यांची कामे लगेच होतात. मात्र सामान्य जतनेला हेलपाटे मारून चपला झिजवाव्या लागतात. सार्वजनिक बांधकाम, महसूल, प्रादेशिक परिवहन, महापालिका, सहकार कार्यालये आदी ठिकाणी हा अनुभव नित्याचा आहे. तेव्हा जिल्हाधिका-यांनी या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांची तीन महिन्यातून बठक घ्यावी. अधिका-यांना कोल्हापूर भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भात सूचना करावी. सर्व खात्यांच्या अधिका-यांची संपत्ती जाहीर करावी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामांचा निपटारा करण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करावी, कोल्हापुरातून निवृत्त झालेल्या शासकीय खात्यांच्या वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, राजु हुंबे, दिलीप पाटील, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, विराज पाटील, राजु यादव, विनोत खोत, डॉ. अनिल पाटील, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, सुमन शिंदे आदींसह शिवसनिक उपस्थित होते.

Story img Loader