कोल्हापूर : उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत असे विधान चंद्रकांदादा पाटील यांनी केले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व कसे आहे हे सांगण्यासाठी चंद्रकांतदादांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे परखड प्रतिउत्तर शिवसेनेचे उपनेते, कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकांद्वारे दिले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वापासून फारकत घेतलेली नाही. आमचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम असे आहे. देशावर प्रेम करणारा कोणीही असो. त्याला राष्ट्रप्रेमी म्हणूनच आम्ही स्वीकारले आहे. हिंदुस्थानात राहून देश विरोधी कारवाई करणाऱ्यांना कायमच त्यांची जागा दाखविण्याचे काम शिवसेने केले आहे. जो भाजपा महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मोठा झाला, त्यांनी आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करून निवडणूका लढवण्यापेक्षा विकासावर भर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे वाढवणे, उद्योग बाहेरील राज्यात जाणार नाहीत हि दक्षता घेणे, व बेरोजगारी कमी करणे गरजेचे आहे. हिंदुत्वाच्या नावावर तरूणांची माथी भडकवून व त्यांचे आयुष्य उध्वस्त करून राजकिय पोळया भाजण्याचे पाप भाजपाने करू नये, असा सल्ला पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना दिला आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

आणखी वाचा-राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई दिल्याशिवाय भूमी संपादन करू देणार नाही; राजू शेट्टी यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

२०१९ साली भाजपाचे २३ खासदार होते. आणि आता नऊच खासदार निवडून आले. मग जागा कोणाच्या कमी झाल्या याचे आत्मचिंतन करावे. पण आमचे ५ खासदारांवरून ९ खासदार झाले हे विसरू नये. तुमच्या आशीर्वादाने पक्ष फोडला. पक्षाचे नाव व चिन्ह चोरले. नविन चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या आशीर्वादाने तुमची जागा दाखविली हे विसरू नका, अशी टीका पवार यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा अनेक वेळा आपण व आपल्या सहकायांनी अपमान केला. त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? , अशी विचारांना पवार यांनी पाटील यांना केली आहे.

धर्मभेद, जातपात हे आपल्या हिंदू देवतांना सुद्धा मान्य नाही आयोध्यापासून नाशिक पर्यंत प्रभु श्री रामचंद्रांने, कोल्हापूरात आई आंबामातेने, तुळजापूरात भवानी मातेने, पंढरपूरात विठूरायाने, शिर्डी येथे साईबाबाने, मुंबापूरीत मुंबा देवीने व सिद्धिविनायकाने सुद्धा कोणाला आशीर्वाद दिले हे दादा जरा तपासून बघा, असा चिमटाही शेवटी संजय पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून काढला आहे.