कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा संकल्प आपले स्वराज्य करण्याचा नाही तर सुराज्य व्हावे असा होता. महाराज आत्मचिंतन करीत तसे आपण शिवभक्तांनी केले पाहिजे. महाराजांचे आचार, विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले.
बेळगाव जवळील होनगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर संभाजी राजे छत्रपती बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतीश जारकीहोळी होते. शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे, असा उल्लेख करून संभाजीराजे म्हणाले, ३५० वर्षानंतरही शिवाजी महाराजांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. इतरांसाठी तडजोड पण शिवाजी महाराजांसाठी तडजोड नाही. कारण ते आपले दैवत आहे.
मराठी भाषक एकवटले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने होनगा परिसरात मराठी भाषक मोठ्या संख्येने एकवटले होते. शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. मराठी भाषकांच्या लढ्याचे प्रतिक असलेले भगवे ध्वज मोठ्या संख्येने फडकत होते.
वाय प्लस सुरक्षा
सीमावाद चिघळला असतानाच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज बेळगाव मध्ये होते. कर्नाटक सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा यंत्रणा पुरवली.