कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृह मध्ये ही अधिसभा पार पडली. यामध्ये शिवाजी विद्यापिठाचे नामविस्तार करण्यात येऊ नये या मागणीचा स्थगन प्रस्ताव ठेवण्यात आला. तो चर्चेविना स्वीकारत असल्याचे कुलगुरू डॉक्टर डी. व्हीं. शिर्के यांनी आज अधिसभेत जाहिर केले. यामुळे एका अर्थाने शिवाजी विद्यापीठ हे नाव कायम राहण्यास मदत झाली असून नामविस्तार करण्याच्या प्रयत्नाला पायबंद लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाची अधिसभा बैठक आज राजर्षी शाहू सभागृह मध्ये पार पडली. एकुण ६४ विषय मांडण्यात आले यावर चर्चा करण्यात आली. सभा सुरू होताच नामविस्तार करू नये असा स्थगन प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव स्वीकारला की नाकारला हे अध्यक्षांनी स्पष्ट सांगावे यासाठी सदस्य अभिषेक मिठारी आणि श्वेता परूळेकर मागणी लावून धरली. यावेळी शिवाजी महाराज की जय आमचे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावे अशी मागणी काही दिवसापासून हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. यासह मोर्चाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या याचे प्रसाद आज शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेत जोरदारपणे उमटले. आधी सभा सदस्यांनी नाविस्ताराला विरोध केला. नाम विस्तार झाले तर याचा शॉर्टफॉर्म केला जाईल आणि शिवाजी महाराजांचे नाव घेतलेले जाणार नाही असा धोका अनेकांनी व्यक्त केला.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तेव्हाच सोडवल्याचं सांगत आता विनाकारण यावर काही संघटना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचां मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळं शिवाजी विद्यापिठाचं नामविस्तार कदापी करू देणार नाही, हेच या बैठकीचा ठराव असल्याचे अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर , संजय परमाने, अजित पाटील, अमित जाधव आदी अधीसभा सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जो पर्यंत अध्यक्ष यावर स्पष्ट मत देत नाहीत तो पर्यंत सभेचे कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा या सदस्यांनी घेतला. अखेर अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी हा प्रस्ताव चर्चेविना स्वीकारत असल्याचे जाहिर केले. यानंतर सभेचे कामकाज सुरू झालं.
पत्रकारांशी बोलताना अभिषेक मिठारी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला नाव देत असताना शिवाजी विद्यापीठ असा जाणीवपूर्वक उल्लेख त्या वेळच्या सर्व अभ्यासक, तज्ञांनी केला होता . लांबलचक नाव असेल तर त्याचे लघुरूप वापरले जाते. कोल्हापूर यातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचा उल्लेख सीपीआर असा केला जातो. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उल्लेख सीएसटी असा केला जातो.त्यामुळे नामविस्तारातील धोके लक्षात घेणे गरजेचे आहे. फोटो – शिवाजी विद्यापीठ अधीसभा सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर घोषणाबाजी केली.