कोल्हापूर : येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ७ दाम्पत्य व अंध व्यक्तींच्या हस्ते दुग्धाभिषेक व ११ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. प्रसाद वाटप करून, प्रेरणा मंत्र घेऊन आतिषबाजी करण्यात आली.
हेही वाचा : विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षा
शहरातील प्रमुख मार्गावरून भगवा ध्वज घेऊन व महाराजांची मूर्ती पालखीमध्ये घेऊन पदयात्रा काढण्यात आली. ध्येयमंत्र व हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणाची पवित्र शपथ घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,कोल्हापूर शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, निलेश पाटील, आशिष पाटील, सुमेध पोवार, रोहित अतिग्रे, अवधूत चौगले, संदीप गुरव, निलेश लगारे, आदित्य जासूद, अनिकेत डवरी, जीवन चौगले, संग्राम निकम , अनिरुद्ध कोल्हापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.