कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली केल्यानंतर तिची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन अर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे केले.
हेही वाचा – Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ चॅट व्हायरल
शिवसेनेच्या वतीने लाडकी बहीण योजनेसह मतदार नोंदणी शिबिराचे उद्घाटन आज क्षीरसागर यांच्या हस्ते शनिवार पेठ येथे करण्यात आले. पहिल्याच शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्षीरसागर म्हणाले, या योजनेमध्ये कागदपत्रांच्या अटी शिथिल करून नोंदणी सोपी केली आहे. शिबिरामध्ये कागदपत्रे तपासून ऑनलाईन फॉर्म जमा केले जातील. बँक खाते नसलेल्या महिलांना जागेवरच पोस्ट खाते सुरु करून देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, पदाधिकारी उपस्थित होते.