कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची आज दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. याआधी सत्तारूढ आणि विरोधी गटांमध्ये संघाच्या कारभारावरून वाक्य युद्ध रंगले आहे तर आज सकाळी विरोधकांनी “उत्तर द्या” या नावाचे फलक उभारून सत्तारूढ गटाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. याला सत्तारूढ गट सभेत कोणते उत्तर देतो याचे कुतूहल आहे. दरम्यान, सभास्थळी सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे सभे आधी तीन तास सभासदांची गर्दी होऊ लागल्याने सभा दणकेबाज होणार हे उघडपणे दिसू लागले आहे.

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत दरवर्षी गोंधळ ठरलेला असतो. याआधी गोकुळमध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. ती आमदार सतेज पाटील यांनी ताब्यात घेतली. तर विरोधी गटामध्ये महाडिक राहिले आहेत.शोमिका महाडिक या एकट्याच विरोधी गटाच्या नेतृत्व करीत आहेत. त्यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासाठी त्यांनी गेले पंधरा दिवस तालुक्यांमध्ये बैठका घेऊन प्रश्नांचा भडिमार केला आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

आणखी वाचा- “कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र

गोकुळ वर प्रश्नचिन्ह गोकुळचा कारभार काटकसरीने चालला असताना खर्चात वाढ कशी झाली? सहकार ऐवजी खाजगी संस्थांकडून दूध घेण्याचे कारण काय? दूध संकलनात घट असताना संकलन खर्चात वाढ कशी झाली? रंजीत धुमाळे यांच्याकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेक आहे? पशुखाद्य कारखान्यात कोटीचे बचत तरीही नफा केवळ एक लाख कसा काय ?अशा पद्धतीच्या प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तर महादेवराव महाडिक यांच्याकडे सत्ता असताना ते सभेच्या वेळी उपस्थित कसे राहतात असा प्रश्न सतेज पाटील करत होते. मग आता गोकुळच्या सभेला सतेज पाटील कोणत्या नियमाने मंचावर उपस्थित राहतात ?असा खडा सवालही शोमिका महाडिक यांनी केला आहे. तर त्याला गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी उत्तर देताना गोकुळचा कारभार योग्य असल्याचे म्हटले आहे. शोमीका महाडिक या गोकुळच्या संचालिका असल्याने त्यांनी संचालक मंडळात प्रश्न विचारले पाहिजेत. सभेमध्ये प्रश्न उपस्थित करून दूध उत्पादक सभासदांचा वेळ घेऊ नये , त्यांचा अधिकार घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे प्रत्युत्तर डोंगरे यांनी दिले आहे.

आणखी वाचा-अडीच एकरातील टोमॅटो शेतकऱ्याकडून जमीनदोस्त, शिरोळ तालुक्यातील घटना; दर घसरल्याने शेतकरी संतप्त

वादळी वातावरण दरम्यान, आज सभेला सुरुवात होण्यापूर्वी सकाळपासूनच विरोधी गटाकडून सभेच्या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये गोकुळच्या गैर कारभाराचा पंचनामा केला आहे. त्या संदर्भातले अनेक प्रश्न गडद काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीच्या फलकावर विचारून एक प्रकारे विरोधी सत्तारूढ गटाच्या काळा कारभाराचा पंचनामा चालवला आहे. त्याला अरुण डोंगळे , सतेज पाटील आणि सत्ताधारी गट कसा उत्तर देतो याची उत्सुकता आहे.

विरोधकांना जागा मिळणे मुश्किल

दरम्यान सत्ताधारी गटाने सकाळपासूनच आपले सदस्य सभास्थळी आणायला सुरुवात केली आहे. यामुळे सभेच्या एक तास भर आधीच निम्म्याहून अधिक जागा सभासदांनी भरून गेल्या होत्या. विरोधी गटाला बसायला जागाच उरणार नाही अशा पद्धतीची रचना दिसत आहे.