कोल्हापूर : अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर येथे घडला. याबाबतची तक्रार घेण्यास पोलिसांनी हयगय  केल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तर मुलाच्या नातेवाईकांना मारहाण घडली. यामुळे गांधीनगर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पोलिसांनी रीतसर दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 याबाबत समजलेली माहिती अशी की, गांधीनगर येथील एका पाच वर्षाच्या मुलीवर झोपडपटीत राहणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार समजल्यावर एकच खळबळ उडाली. याबाबत तक्रार देण्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईक दाखल झाले. मात्र पोलीस पुरेसे सहकार्य करत नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे पडले.दरम्यान या प्रकाराची वाच्छता व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर मध्ये सर्वत्र झाली. पाठोपाठ येथे व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने जमला. त्यांनी आरोपीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुरू ठेवली. यातून गोंधळ वाढत गेला. दरम्यान, संबंधित मुलाच्या नातेवाईकांना जमावाने मारहाण केली. यावरून वाद वाढत गेला. संतप्त जमावाला काबूत आणण्यासाठी लाठीमार करावा लागला.

हेही वाचा >>>मळीच्या निर्यातीवर ५० टक्के शुल्क

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गांधीनगर पोलिसांसह शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल येथील पोलिसांची जादा कुमक तसेच शीघ्र कृती दल दाखल झाले.पोलीस स्टेशन व बाजारपेठेच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी व पोलिसांनी जमावाला शांत केले. याबाबतची रीतसर तक्रार घेण्याचे काम रात्री पोलीस ठाण्यामध्ये सुरू होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhi community march on police station due to extreme incident on minor girl kolhapur amy