लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा किंचित कमी झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीत काहीशी ओसरली आहे. साळगाव या बंधाऱ्यावरील पाणीही कमी झाले आहे. तर जाम्भरे प्रकल्प शुक्रवारी पहाटेपासून ओसंडून वाहू लागला आहे.

या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे कालपर्यंत जिल्ह्यातील २९ बंधारे पाण्याखाली होते. त्यापैकी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर काल २६ फूट ९ इंच पाणी होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ही पाणी पातळी २५ फूट २ इंच होती. पंचगंगा नदीचे पाणी अजूनही विस्तारलेले आहे.

आणखी वाचा-‘गोकुळ’चा मुंबई, पुण्यातील ग्राहकांना फटका; दूध महागले

काल गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४ मिमी पाऊस झाला. शिवाय शाहूवाडी १८.८, राधानगरी १३ , भुदरगड १६. ९ , चंदगड १६.९ मिमी असा पाऊस झाला. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी,कडवी आदी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. चंदगड तालुक्यातील जांबरे मध्यम प्रकल्प पहाटे दोन वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slight drop in water level in kolhapur jambre project was filled to the brim mrj
Show comments