इचलकरंजी शहरात सोलर सिटी व मोफत वायफाय सुविधा पुरविण्याची घोषणा करीत आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरवासीयांना सामाजिक कार्याची सुवर्ण भेट गुरुवारी दिली. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना पत्र पाठवून हे दोन्ही प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चच्रेस घेऊन मंजूर करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सुविधांसाठी नगरपालिकेवर कोणताही आíथक भार पडणार नाही.
याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात आमदार हाळवणकर यांनी म्हटले आहे, ई गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या उपक्रमामुळे प्रशासनातील अनेक सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच मोबाईलद्वारे सुध्दा या योजनांचा वापर करता येतो. त्यासाठी जलद गतीने इंटरनेट कनेक्टीव्हीटी पुरविणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक नगरपालिकांनी नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजी शहरातसुध्दा मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ‘रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेड’ य कंपनीची वायफाय सेवा २८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी ही कंपनी आपणास १ महिना मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तरी त्यानंतर प्रती दिन प्रती व्यक्ती २० मिनिटे फोर-जी स्पीडने वायफाय मोफत मिळेल व त्यानंतर खर्च वापरणाऱ्या व्यक्तीला भरावा लागेल. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा (वीज बिलासह) ही कंपनी स्वखर्चाने करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा