कोल्हापूर : दिवस खरेतर आंब्याला मोहोर येण्याचे. वसंताची चाहूल लागली की कोल्हापुरात शेजारच्या कोकणातून आंबा दाखल होतो. पण यंदा मात्र दोन तीन महिने आधीच आंबा करवीर नगरीत आला आहे. पण, मंडळी तो कोकणभूमीतील नव्हे तर दक्षिण आफ्रिका देशातून आलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरच्या बाजार समितीत आंबा हंगाम सुरू होण्यास अजून अवधी आहे. अद्याप फळांचा राजा मानल्या जाणारा हापूस आंब्याला मोहोरसुद्धा आलेला नाही. एप्रिल – मे महिन्याच्या कालावधीमध्ये हा आंबा बाजारात उपलब्ध होतो. मात्र सद्या कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीत चर्चा आहे ती दक्षिण आफ्रिका येथील मालावी शहरातून आवक झालेल्या हापूस आंब्याची. सध्या १० पेट्या दाखल झाल्या आहेत. १५ आंबे असलेल्या एका पेटीची किंमत ३८०० रुपये आहे.

हेही वाचा – कोल्हापूरचा पंचगंगा घाट हजारो दिव्यांनी प्रकाशमान

हेही वाचा – राजू शेट्टी यांचा एकाचवेळी अनेकांशी सामना

कोकणातील झाडांच्या काट्या आफ्रिकन देश मलावीमध्ये नेण्यात आल्या होत्या. तेथे या आंब्याची लागवड करण्यात आली. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने बाजारात ग्राहकांची चांगलीच मागणी आहे, अशी माहिती फळांचे घाऊक व्यापारी जुबेर बागवान यांनी सोमवारी दिली. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात वाढत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa hapus mango enter in kolhapur ssb
Show comments