कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे मनिकर्निका कुंड, गरुड मंडप व नगारखाना इमारत या तीन कामांच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये खर्चाला खर्च करण्यास देवस्थान व्यवस्थापन समितीला शुक्रवारी राज्य शासनाने मान्यता दिली.

हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Sale of Jagannath Baba Sansthans land without permission Former MLAs allege against Mahavikas Aghadi candidate
वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित

हेही वाचा – उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक, भाजपा जिल्हाध्यक्षांनाच घातला घेराव

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांनी निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे मनिकर्णिका कुंड दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ५८ लाख रुपये व नगरखाना इमारत दुरुस्ती कामासाठी ३ कोटी ४१ लाख रुपये याप्रमाणे येणाऱ्या खर्चास राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबतचे अंदाजपत्रक व आराखडा पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी याबाबतची तांत्रिक तपासणी व पडताळणी केल्यानंतर तिन्ही अंदाजपत्रके आराखडा पुरातत्त्व संकेतानुसार तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचे प्रमाणपत्र तसेच बांधकाम विभागाने अटीसह मान्यता दिली. त्यानुसार या कामाला राज्य शासनाने मान्यता दिल्याचे आज विधी व न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.