लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : स्थिर सर्वेक्षण पथकाला शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत एका वाहनात ५ कोटी ५८ लाखांचे मौल्यवान दागिने कारवाईत आढळले.

Madhurimaraje chhatrapatis withdrawal from vidhan sabha election 2024 defamation of Congress in Kolhapur North
‘कोल्हापूर उत्तर’मध्ये काँग्रेस अनुत्तरीत! काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांची परस्पर माघार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथाकडून शिरोली जकात नाका येथील तपासणी नाक्यावर ९०७ वाहने तपासण्यात आली. सायंकाळी ६ च्या दरम्यान रेडिअंट व्हॅल्युएबल लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात ४ कोटी ३ लाख रुपये इतक्या किंमतीचे सोने, ११ लाख ५१ हजार रुपये किमतीची चांदी, तर १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे हिरे असे एकूण ५ कोटी ५८ लाख रुपये किंमतीचे दागिने आढळून आले.

आणखी वाचा-‘कोल्हापूर उत्तर’मध्ये काँग्रेस अनुत्तरीत! काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांची परस्पर माघार

त्यातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता हे दागिने चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स लिमिटेड यांचे असल्याचे सांगितले. कागदपत्रांची पडताळणी प्राप्तीकर विभाग व वस्तू व सेवा कर विभागामार्फत सुरु असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी सांगितले.

Story img Loader