कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगपती गौतम अडाणी समूहाच्यावतीने सुरू होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला पाटगाव धरणातून पाणी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी बुधवारी गारगोटी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपा, शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगपती गौतम अडाणी यांचा २१०० मेगाव्हॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला भुदरगड तालुक्यातील पाटगाव गावातील नागरिकांनी पाणी देण्यास विरोध केला आहे. पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार

हेही वाचा – मराठा आरक्षण: मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर एकनाथ शिंदेंची जाहीर विनंती, म्हणाले…

यासाठी १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले असून त्यापैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा करण्यात येणार आहे. यासाठी अंजीवडे गावाच्या माथ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातून टनेल सदृश पाइपलाइनद्वारे पाणी अंजिवडे येथे उभारल्या जाणाऱ्या जलसाठ्यात सोडले जाणार आहे. मात्र याला पाटगावमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पाटगाव धरण क्षेत्रामध्ये अनेक गावे असून पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या पाण्यापर्यंत या धरणातील पाण्याचा उपयोग या गावातील नागरिक करतात. मात्र, गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता आणि विश्वासात न घेता या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता कशी दिली? राज्य सरकारने याबाबतची आपली भूमिका केंद्राकडे मांडली त्यावेळी भुदरगडमधल्या लोकप्रतिनिधींना याची कल्पना होती की नव्हती अशी विचारणा यावेळी आंदोलकांनी केली.

हेही वाचा – सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत

आंदोलनात गावकऱ्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने माजी आमदार के. पी. पाटील यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यावेळी पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने या आंदोलनात जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री स्वतः सहभागी होऊन त्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे का नाही आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी ठाकरे गटाचे प्रकाश पाटील यांनी केली. तर सरकारने या प्रकल्पासंदर्भात ठोस निर्णय नाही घेतला टोकाची लढाई करू, पण पाडगाव धरणातील एक थेंबही पाणी या प्रकल्पाला देणार नाही, अशी भूमिका कृती समितीने मांडली आहे.