दयानंद लिपारे

कोल्हापूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानानंतर ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे लक्ष वळवले आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईला नेल्याने ईडीच्या कामकाज पद्धतीवर कर्मचारी, कर्मचारी संघटना यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यातून ईडी, मुश्रीफ, त्यांचे समर्थक, कामगार संघटना असा संघर्षांचा परीघ वाढत चालला आहे. त्यातून भाजपच्या विरोधात वातावरण तापले आहे.

BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MNS workers beat up bullet drivers who made noise in Nigadi pune news
MNS News: पुण्यात मनसेचा बुलेट चालकाला चोप, कर्णकर्कश्य आवाजाच्या सायलेन्सर त्रासाविरोधात धडक कारवाई
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
Loksatta editorial on Uniform Civil Code implemented in Uttarakhand
अग्रलेख: दुसरा ‘जीएसटी’!

भाजपने हसन मुश्रीफ यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार केली. त्यावर प्रथम प्राप्तिकर विभागाने तर आता ईडीने चौकशीचा ससेमिरा मुश्रीफ यांच्यामागे लावला आहे. मुश्रीफ यांच्या कागल, पुणे येथील निवासस्थानांवर गेल्या महिन्यात छापेमारी केल्यानंतर आता ईडीने मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

गेल्या आठवडय़ात या बँकेत अधिकाऱ्यांनी दोन दिवस चौकशी केली. महत्त्वाची कागदपत्रे हाती घेतली आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांची दीर्घकाळ कसून चौकशी केली जात होती. दुसऱ्या दिवशी बँकेतून बाहेर पडताना ईडीच्या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. इतकेच नव्हे तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच प्रमुख अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. त्यांची ईडीच्या मुंबई कार्यालयातही चौकशी करण्यात आली. हे पाहता ईडीने मुश्रीफ यांच्या विरुद्धची चौकशी पुढील टप्प्यावर सुरू ठेवली आहे. या निमित्ताने ईडी – मुश्रीफ यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर आला आहे.

कागल येथील मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर व ईडीने छापेमारी केली तेव्हा दोन्ही वेळी मुश्रीफ समर्थक मोठय़ा संख्येने घराजवळ जमले होते. पोलिसांचे कडे तोडून कार्यकर्त्यांनी घराकडे धाव घेतली होती. तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या छापेमारी वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा रोष दिसून आला. ईडीच्या पथकाने बँकेत पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. दुसऱ्या दिवशीही हे सत्र पुढे सुरू राहिले. ३० तासांच्या चौकशीमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. ईडीचे पथक बँकेतून बाहेर पडत असताना बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेवर कारवाईप्रकरणी केंद्र शासनाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी बँकेच्या दोन्ही कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनीही ईडीच्या कामकाज पद्धतीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. ईडीविरोधात वातावरणनिर्मितीचा हा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

कागल येथील मुश्रीफ समर्थक आणि कोल्हापूर येथील बँक कर्मचाऱ्यांनी कारवाईविरोधात भूमिका घेतली. दोन्ही वेळच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी ईडीच्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. यातून ईडी, मुश्रीफ आणि समर्थक, बँक कर्मचारी यांच्यातील ताणतणाव अधिकच वाढत चालला असल्याचे दिसत आहे.

कामगार संघटना आक्रमक

बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी यावर भाष्य केले आहे. कोल्हापूर बँक अतिशय चांगली चालली असताना ईडीने कारवाई करणे अयोग्य आहे. यामागे गलिच्छ पक्षीय राजकारण आहे. अशा पद्धतीची कारवाई पुन्हा झाली तर कर्मचारी संघर्षांची भूमिका घेतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. दिघे यांनी घेतली आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी ईडीच्या २२ अधिकाऱ्यांनी बँकेतील ३० कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अमानुष छळ केला, असा आरोप केला आहे. ३० तासांच्या चौकशीमुळे सुनील लाड या अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. अन्य काही अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे. याला जबाबदार असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.

Story img Loader