कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका शाळेसमोर खेळत असताना विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. शौर्य भोसले असे त्याचे नाव आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील हितनी या गावात माकडांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या संकेत पाटील या विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण झाली.
हेही वाचा – कोल्हापुरात भर पावसातही गुरुपौर्णिमेचा उत्साह; नृसिंहवाडीत रीघ
हेही वाचा – कोल्हापूर : पाऊस – रविवार समीकरण कायम; राधानगरी धरण काठोकाठ
कोल्हापुरातील व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजारामपुरी भागांमध्ये ही घटना घडली आहे. राजारामपुरी दहाव्या गल्लीत असलेल्या पाटणे हायस्कूलसमोर मुले खेळत होती. झाडावर बसलेल्या माकडांच्या कळपाने हल्ला चढवला. शौर्य भोसले हा विद्यार्थी पळून बाजूला जात असताना माकडाने अंगावर उडी मारली. शौर्य रस्त्यावर पडल्याने डोक्याला दुखापत झाली. परिसरातील लोकांनी माकडांना हुसकावून शौर्यची सुटका केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.