‘ एफआरपी’ ८० टक्के प्रमाणे ऊस बील मिळण्याच्या आंदोलनाचे लोण गुरुवारी जिल्’ााच्या पश्चिमेकडील भागाकडे सरकले. वारणा, भोगावती या कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली. भोगावती परिसरात चारशेहून अधिक वाहने रोखली होती. तर वारणा कारखान्यावर स्वाभिमानीच्या वतीने रॅली काढली असता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोडतोड करण्यात आली.
एफआरपी प्रमाणे बिले मिळण्यासाठी स्वाभिमानीने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. गेली तीन दिवस हातकणंगले  व शिरोळ या पूर्वेकडील भागाकडे आंदोलनाचा जोर होता. गुरुवारी तो पश्चिमेकडील भागाकडे सरकला. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मोठय़ा संख्येने जमलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून ऊस वाहतूक रोखून धरली. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करताना एफआरपीप्रमाणे ऊस बिले मिळण्याची मागणी सुरू ठेवली यामुळे बिद्री, भोगावती, शाहू, मंडलिक, सेनापती कापसी, गडिहग्लज या कारखान्याकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीला फटका बसला. आंदोलकांनी वाहतूक रोखून धरल्याने चारशेहून अधिक वाहने रस्त्यावर अडवली गेली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज वारणा साखर कारखान्यावर दुचाकी रॅली काढली. रॅली जात असताना समोरून ऊस वाहतूक करणारी वाहने आल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी वाहने रोखून धरली. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोडतोड करण्यात आली. वाहनधारकावर दगडफेक करण्यात आली.
जिल्हा बँकेत बठक
दरम्यान, सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेमध्ये याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी बठक बोलावली होती. बठकीस सर्वपक्षीय साखर कारखानदार उपस्थित होते. या स्थितीत नेमका कोणता मार्ग काढावा याविषयी दीर्घकाळ चर्चा सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा