येथील छायाचित्रकाराने स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी निदर्शनास आला. आनंदराव दत्तात्रय चौगुले असे या छायाचित्रकाराचे नाव आहे. त्याच्या सुसाइड नोटमध्ये भाजपाच्या नगरसेवकाच्या छळ-धमक्यांमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असून पोलिस या पत्रातील सत्यता पडताळून पाहत आहेत. तर पत्रामध्ये भाजपाच्या नगरसेवकाच्या नावाचा उल्लेख आल्याने शिवसेनेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून नगरसेवक आर.डी.पाटील यास त्याच्या मुलासह अटक करावी, अशी मागणी केली. सायंकाळपर्यंत कारवाई न झाल्याने आमदार राजेश क्षीरसागर यांनी सायंकाळी पुन्हा एकदा हे आंदोलन ताणवत ठेवल्याने आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
खरी कॉर्नर येथे चौगुले यांचा आनंद फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत चौगुले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी स्टुडिओचा शोध घेतला असता तेथे चौगुले यांची सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये भाजप नगरसेवक आर.डी.पाटील, त्यांची दोन मुले व  महापालिकेचा कर्मचारी धनाजी िशदे यांच्याकडून आíथक व्यवहारातून होणारा छळ, धमक्यांमुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी चौगुले यांचे हस्ताक्षर तपासून पुढील कारवाई करण्याचे ठरविले. दरम्यान, चौगुले यांचे आर.डी.पाटील यांच्याशी गेली २५-३० वष्रे घनिष्ठ संबंध आहेत. पाटील यांच्या विजयात चौगुले यांनी सातत्याने योगदान दिले होते. दोघांमध्ये आíथक व्यवहारही झाले होते, असे पत्रातील तपशिलातून दिसून येते.
सुसाइड नोटमध्ये भाजपाच्या नगरसेवकाचा नामोल्लेख झाल्याने शिवसेनेकडून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह शिवसनिकांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन आर.डी.पाटील, त्यांची मुले, धनाजी िशदे यांना अटक करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेनेने आरोपींवर सायंकाळपर्यंत कारवाई न केल्यास संध्याकाळी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार सायंकाळी शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांनी सायंकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केल्याने आत्महत्या प्रकरणाला आणखीनच गंभीर राजकीय वळण मिळाले.

Story img Loader