विधान परिषद निवडणुकीतील महादेवराव महाडिक व सतेज पाटील या दोघा उमेदवारांनी रविवारी दिवसभर मतदारांशी संपर्क साधून पािठबा मिळवण्याचा प्रयत्न केला. इचलकरंजी येथे शहर विकास आघाडीची बठक होऊन महाडिक यांना पािठबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महाडिकांना आधार मिळाला. तर मुरगूड येथे झालेल्या बठकीत मंडलिक गटाच्या नगरसेवकांनी महडिकांच्या विधान परिषदेच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नांचा मारा केला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील जांभळे व कारंडे या दोन्ही गटाच्या नगरसेवकांची बठक घेऊन सतेज पाटील यांना पािठबा देण्याचे आवाहन केले.
विधान परिषदेच्या आखाडय़ात महाडिक विरुध्द पाटील अशी लढत रंगत आहे. मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मत आपल्याकडे खेचण्याचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी महाडिक यांनी रविवारी मुरगूड येथे मंडलिक गटाच्या नगरसेवकांशी चर्चा करून पािठबा देण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवकांनी गतवेळी निवडणूक झाल्यापासून तुम्ही इकडे फिरकलाच नाही, तुमच्या आमदारकीचा नगरपालिकेला काहीच उपयोग झाला नाही, गोकुळमध्ये मंडलिक गटाला डावलण्यात आले, असे म्हणत महाडिक यांच्या चुका त्यांच्या तोंडावरच बोलून दाखवल्या. महाडिक यांनी आपल्या कारभारामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. सतेज पाटील हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असल्याने त्यांच्याऐवजी माझ्यासारख्या सामान्यांत मिळून मिसळून राहणाऱ्या उमेदवारास निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. अखेरीस नगरसेवकांनी संजय मंडलिक यांचा निर्णय मानून मतदान करणार असल्याचे सांगितले. चच्रेत राजेखान जमादार, प्रल्हाद खराडे, रुपाली सनगर, अनिता भोसले आदी नगरसेवक सहभागी झाले होते. कामठी येथे जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असल्याने मंडलिक व संजय घाटगे तिकडे असल्याने त्यांची महाडिकांची भेट झाली नाही. ज्या प्रकारे नगरसेवकांचे वर्तन राहिले ते पाहता मंडलिक गटाचा महाडिकांना पािठबा कितपत मिळेल याबाबत शंका आहे.
इचलकरंजीतील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महाडिक यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय एका बठकीत घेतला. भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधान परिषदेतील काँग्रेसची संख्या कमी करण्यासाठी महाडिकांना पािठबा दिल्याचे सांगून त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. अजित जाधव, जयवंत लायकर, मदन झोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ यांना रविवारी इचलकरंजीतील गटबाजी लक्षात घेऊन दोन बठका घ्याव्या लागल्या. माजी आमदार अशोक जांभळे व माजी शहराध्यक्ष मदन कारंडे यांच्या निवासस्थानी या दोन बठका झाल्या. बठकांना दोन्ही गटाचे नगरसेवक तसेच बादशहा बागवान, सागर चाळके यांची उपस्थिती होती. मुश्रीफ यांनी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पािठबा दिला असल्याने त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
कोरे गटाचा आज निर्णय
जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांच्या पािठब्याबाबत सोमवारी बठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी सांगितले. यापूर्वी कोरे यांची सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या समवेत तसेच महाडिक यांच्याशीही चर्चा झाली असल्याने त्यांच्या निर्णयाचे कुतूहल आहे. कोरे-महाडिक यांचे सख्य पाहता ते त्यांच्या पाठीशी राहण्याबाबत साशंकता आहे.

Story img Loader