कोल्हापूर :केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते, खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीच्या सदस्यपदी फेरनिवड केली आहे. महाराष्ट्रातून सुनेत्रा पवार यांनाही संधी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग समितीच्या सल्लागार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार माने यांना या समितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योगासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. या समितीवर परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्घेरिटा, विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, सूचना प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचा समावेश असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा