कोल्हापूर : शिरोळ तालुक्यामध्ये काल झालेल्या खुनाचा उलगडा २४ तासात करण्यात कुरुंदवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित माळाप्पा करप्पा हेग्नाणावर (वय २५, रा, हेग्नाणावर कोडी, ता. चिकोडी, बेळगाव) यास बुधवारी अटक केली आहे.
सावकार कलाप्पा देबाजे (रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) याचा कुरुंदवाड – मजरेवाडी रस्त्यावर शेतात निघृणपणे गळा कापून खून केल्याची घटना काल उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिस तपास घेत असता देबाजे याचा नातेवाईक माळाप्पा बेपत्ता असल्याचे समजले. खोलवर विचारपूस केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
खुनाचे कारण
माळाप्पा मलप्पा हा अंगावरून लिंबू उतरून टाकण्याचा उपाय सांगत असे. सावकार देबाजे याला त्याचा कौटुंबिक त्रास दूर करण्यासाठी माळाप्पा याने लिंबू उतरवण्याच्या बहाण्याने घटनास्थळी नेऊन दोरीने हात पाय बांधून कुऱ्हाडीने वार करून खून केला. यामागे कारण असे कि, बेबाजे हा माळाप्पा याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करत होता. त्यातून माळाप्पा व देबाजे यांच्यात वाद झाला होता. या रागातून माळाप्पा याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.