केंद्रात व राज्यात भाजपसमवेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून अवमानकारक वागणूक मिळत असल्याने स्वाभिमानीचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. याची परिणती म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेनेकडे झुकत चालली असल्याचे दिसत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक या महापालिकांमध्ये तसेच कोल्हापूरसह काही जिल्हा परिषदांमध्ये स्वाभिमानी शिवसेनेसोबत राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपकडून दुखावले गेलेले हे दोन्ही पक्ष शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने एकत्र येत चालले आहेत. दोन्ही पक्षांशी ग्रामीण भागातील ताकद लक्षात घेता हे नवे समीकरण उभय पक्षांना फायद्याचे ठरण्याबरोबरच भाजपला त्रासदायक ठरण्याची शक्यता जाणवत आहे.
महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचा मुद्दा हा भलताच वादग्रस्त ठरला. त्याचे पडसाद प्रचार ऐन रंगात आला असताना अजूनही उमटताना दिसत आहेत. या मुद्यावरून भाजप व शिवसेना एकमेकांवर विखारी टीका करीत आहेत. जागावाटपात डावलले गेल्याच्या मुद्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही रान उठवण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे पुणे येथे शिवसेनेच्या प्रचारासाठी आले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानीचा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र सादर केले. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली असतानाही ठाकरे यांनी पांडे यांना त्यांची भूमिका मांडण्यास सांगून स्वाभिमानीशी मत्री जुळवण्याचे संकेतही दिले आहेत. शिवसेना व स्वाभिमानी यांच्यातील गूळपीठ पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करण्याच्या मन:स्थितीत आहेत. इतकेच नव्हे तर राज्याच्या बदलत्या राजकारणात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची नांदी असल्याचे मानले जात आहे. भाजपकडून दुखावल्या गेलेले रासपचे महादेव जानकर हेसुद्धा याच गोटात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून राज्याच्या राजकारणात नवे समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.
शिवसेना व स्वाभिमानी यांना एकत्र आणण्याचा आणखी एक समान दुवा हा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय आहे. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या मुद्यावरून अगोदरच देशभर वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.
तर जिल्हा परिषद निवडणुकातील ग्रामीण भागाची मतपेटी लक्षात घेऊन शिवसेनेनेही या मुद्याला हवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कृषी कर्जमाफीच्या मुद्यावरून या दोन्ही पक्षांतील मत्री आणखी दृढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
खुद्द शेट्टी यांच्या कोल्हापूर जिल्’ाात स्वाभिमानीने कागल व हातकणंगले तालुक्यातील काही मतदारसंघात शिवसेनेशी साटेलोटे केलेले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्’ाातील काही मतदारसंघात स्वाभिमानी संघटना ही काँग्रेस, राष्ट्रवादी व स्थानिक आघाडीसोबत जाताना दिसत आहे. त्यामुळे शेट्टी यांची निश्चित भूमिका कोणती यावरूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. तर सदाभाऊ खोत यांच्या पुत्राच्या प्रचारात भाग घेण्यावरूनही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली आहे. खोत यांचे वर्तन पक्षाला घातक ठरण्याची शक्यता कार्यकत्रे शेट्टी यांच्याजवळ बोलून दाखवत आहेत. यावर शेट्टी यांनी तूर्तास संयम बाळगण्याचे ठरवले आहे. याबाबत निवडणुकीनंतर पक्ष कार्यकारिणीच्या बठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पुणे, िपपरी-चिंचवड व नाशिक येथे भाजपकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताकदीच्या मुद्यावरून डिवचण्यात आले होते. त्यावरून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवण्याच्या इराद्याने शिवसेनाला पािठबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.