Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : भारताच्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

असाही योगायोग –

ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील या विशेष योगायोगची चर्चा सुरु आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

कोण आहे स्वप्नील कुसाळे?

स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून स्पॉन्सशिप मिळाली.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 6 : स्वप्नील कुसळेने भारताला मिळवून दिले तिसरे पदक, ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये जिंकले कांस्य

नेमबाज नाही, तर धोनी स्वप्नीलचा आदर्श –

ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.

स्वप्नील काय म्हणाला?

तो म्हणाला, ‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.

हेही वाचा – Swapnil Kusale won Bronze : धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे? जाणून घ्या

स्वप्नील कुसाळेला रेल्वेत अधिकारी पदावर मिळणार बढती –

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीच्या सहाव्या दिवशी भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळेने इतिहास रचला. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. स्वप्नीलच्या विजयानंतर मध्य रेल्वेमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेचे जीएम रामकरण यादव म्हणाले की, ‘स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीटीई म्हणून कार्यरत आहे, आता त्याची पदोन्नती रेल्वेच्या धोरणानुसार होईल. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्यांना ऑफिसर कॅडर दिले जाते, त्यामुळे त्याला ओएसडी स्पोर्ट्स केले जाईल.’

Story img Loader