कोल्हापूर : मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून एका व्यक्तीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी येथे घडली आहे. या हल्ल्यात महंमदखान तोता खान पठाण ( वय ५२) हे जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.
सदर बाजार परिसरातील एका मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्ववादातून दोन गटांमध्ये धूसफूस सुरू आहे. त्यातून दुपारी तीन ते चार हल्लेखोरांनी पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
हेही वाचा – इचलकरंजीतील तरुणाच्या खुनाचे धागेधोरे तेलंगणात; तिघांना अटक
तरीही हल्ला झालाच
शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पुढील धोका टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी नुकतेच कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारी प्रवृत्तीला इशारा दिला होता, पण आज दुपार त्याच परिसरात खुनी हल्ला झाल्याने नागरिकांतून जोरदार चर्चा होत आहे.