लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवारी होणार असून, दहा मतदारसंघांतील प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वच मतदारसंघांत आत्यंतिक चुरस असल्याने निकालाचे कुतूहल दाटले आहे. यातूनच कार्यकर्त्यांमध्ये शेकड्यापासून ते लाखाच्या पैजा लागल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ईर्षेने मतदान पार पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेला टक्का कोणाला लाभदायक ठरणार, लाडक्या बहिणींचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यंदा मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचे प्रमाण बरेच कमी असणार आहे. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत निकालाचे पारडे वर-खाली होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेत तरबेज असणाऱ्या कार्यकर्त्यांची कुमक मोजणीसाठी उतरवण्यावर भर दिला आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरात निकालापूर्वीच अनेकांना मंत्रिपदाचे वेध, उमेदवारांकडून दावे-प्रतिदावे सुरू

जिल्ह्यातील मतमोजणी ठिकाणे :

चंदगड- पॅव्हेलिअन हॉल, गडहिंग्लज. राधानगरी- तालुका क्रीडा संकुल, गारगोटी. कागल – जवाहर नवोदय विद्यालय. कोल्हापूर दक्षिण- व्ही. टी. पाटील सभागृह. करवीर, कोल्हापूर उत्तर- शासकीय धान्य गोदाम रमणमळा. शाहूवाडी -जुने शासकीय धान्य गोदाम. हातकणंगले – शासकीय धान्य गोदाम. इचलकरंजी- राजीव गांधी सांस्कृतिक भवन. शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: System ready for counting of votes in kolhapur mrj